घरातून प्रसन्न होऊन बाहेर पडलेली व्यक्ती कुणाचही अहित करत नाही. परोपकाराने जगण्याची वृत्ती गृहसंस्कारानेच प्राप्त होते.सकाळी उठुन आईवडिलांचं दर्शन घेता येणं हा या जगातला सर्वात मोठा वेदांत आहे. साध्या वाटणाऱ्या या कृतीने शरिरांतर्गत कितीतरी अदभूत रसायणं तयार होतात.सत्कर्माची ताकद त्यातुनच तयार होत असते.

आपण कितीही मोठे विचारवंत असाल आणि जर आपल्यात आईवडिलांच्या पायावर डोकं टेकवण्याची शक्ती नसेल तर आपलं जीवन फसवं आहे, बोगस आहे. जीवनाच्या एका वळणावर त्याची आठवण करुन देण्याची यंत्रणा निसर्गदत्त आहे.
आपल्या घरात स्थैर्य नसेल तर आपल्या हातुन परोपकार घडणार नाही. विनाशकारी कृत्य करण्यानेच आपल्याला बरे वाटेल.कारण घरातील अस्थैय.वड्याचं तेल वांग्यावर काढण्याचा हा प्रकार असतो.कुटुंब आनंदी ठेवण्यात आपण अपयशी झालात तर बाकी सर्व स्वतःच्या फसवणुकीचा भाग आहे. बाहेरुन अलबेल दाखवण्याचा प्रयत्न आतुध किती जाळतो हे त्यालाच सांगता येईल जो ते जीवन जगत आहे.

सज्जनहो घर नावाचं मंदिर आम्हाला पवित्र ठेवता आलं तर वेगळ्या विठ्ठल रखुमाई दर्शनाची गरज लागणार नाही. पण हे बोलण्या इतकं सोपं नाही. त्यासाठी खूप त्याग आणि अपमान सहन करण्याची शक्ती निर्माण करावी लागेल.समाजात अशांतता निर्माण करणाऱ्या व्यक्ती प्रपंचात हरलेल्या असतात.हे साधं गणित लक्षात ठेवण्यासारखं आहे. तुकोबाराय म्हणतात, बोले तैसा चाले।त्याची वंदावी पाऊले।।अशा पावलांचा शोध घेता यायला हवा.अशी संगत आमच्या जीवनाची रंगत वाढवील.
रामकृष्णहरी

from https://ift.tt/0ROIAf2

By News

Leave a Reply

Your email address will not be published.