मुंबई : कोरोना महामारीने जगभरात थैमान घातले आहे. त्यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण मोहिम राबवल्या जात आहेत. नागरीकांना लसीकरण करण्यासाठी आवाहन केले जातेय. त्यामुळे सरकारकडून कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुुरु आहेत.लसीकरण हे कोरोना महामारीचं एकमेव शस्त्र आहे.
लसीकरणामुळे कोरोनाला आळा घालण्यासाठी मदत होत आहे. त्यामुळे देशभरात लसीकरण मोहिमेवर भर दिला जात आहे.नागरिकांनी पुढे येत लस घ्यावी, असं वारंवार सरकारकडून सांगितले जात आहे. लसीकरणामुळे कोरोना बऱ्याचं अंशी आटोक्यात आल्याचे चित्र आहे.कोरोना लस घेण्यासाठी अनेकजण प्रबोधन करताना दिसतात. अशातच आता निवृत्ती महाराज इंदुरीकरही लस घेण्यासाठी प्रबोधन करणार आहे. लस न घेणारे इंदुरीकर महाराजच लसीकरणासाठी प्रबोधन करणार म्हटल्यावर सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मागेच इंदुरीकर यांनी ‘मी लस घेतली नाही, घेणार नाही’, असं सांगितलं होतं. मात्र इतरांनी लस घेऊ नये असं मी कुठेही म्हटलेले नाही,’ असेही त्यांनी स्पष्ट केलं होतं.राज्य सरकार लसीकरण मोहिमेसाठी इंदुरीकर महाराजांची मदत घेणार आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी इंदुरीकरांशी फोनवर चर्चा केली आहे. त्यामुळे आता इंदुरीकर हे ग्रामीण भागात लसीकरणासाठी कीर्तनातून प्रबोधन करणार आहे.आता लस घेऊ नका म्हणणारे इंदुरीकरच लस घ्या, असं प्रबोधन करणार आहे. त्यामुळे यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. अनेकांनी त्यांच्यावर टीकाही करायला सुरुवात केली आहे.दरम्यान, महाराष्ट्रासह देशाभरात नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी म्हणून शासन प्रशासन प्रयत्नांची पराकष्ठा करत आहेत.

from https://ift.tt/32iL1v7

By News

Leave a Reply

Your email address will not be published.