आत्मस्वरुपाचे ज्ञान होणार नाही तोवर देहाभिमान सुटत नाही. देहाभिमान म्हटलं की अहंकार आलाच. कारण अहंकाराशिवाय कोणतीही कर्मगती प्राप्त होत नाही. मी रोज मंदिरात जाऊन दर्शन घेतो.या वाक्यात अहंकार स्थापित आहेच.कर्म चांगले असो की वाईट त्याला अहंकारातुनच उर्जा मिळते. मन,बुद्धी, चित्तालाही दोलायमान ठेवणारा अहंकारच आहे. स्वस्वरुपाचे ज्ञान होण्यासाठी शरीर महत्त्वाचे आहे पण ते शरीर म्हणजे’मी’ ही धारणा नष्ट होणे गरजेचे आहे.
सुखलोलुप जगतात आपणच का वेगळं जगायचं?,इच्छांना आपणच का मुरड घालायची?,आपण तुपाशी खातो की उपवासी रहातो हे कुणाला कळणार आहे? असे एक ना अनेक प्रश्न न पडतील तरच नवल! या सगळ्यांची उत्तर मिळाल्याखेरीज बेबनाव,नकलीपणा,असत्याचा क्लेश कळणार नाही. आता हे तुम्हाला आम्हाला कोणी शिकवायला येईल असं वाटत का?नाही कुणीही येणार नाही.
आपणच आपली वाट लागण्याच्या आत मुख्य वाट शोधली पाहिजे. भ्रष्ट आचारानं प्राप्त झालेलं सुख आणि परोपकाराने प्राप्त झालेलं सुख यात काय फरक आहे?आपणच आपल्या मनाला विचारलं की मनच ग्वाही देईल. टेबलाखालुन घेतलेल्या पुडक्याने सुख प्राप्त होणारच आहे. पण ते जाहीर उपभोगता येणार नाही.
असत्याच्या जिन्यावरुनच पुढे जावे लागणार. अपराधाची धाकधूक क्षणभर तरी होणारच.

भुकेलेल्या व्यक्तीला अन्न देऊन तृप्त केल्याचा आनंद गगनाहुन मोठा आहे. सुखाच्या पलिकडची अवस्था म्हणजे आनंद.तो सर्वांसमोर उपभोगताही येतो. हे केवळ उदाहरणादाखल आहे. अशा कितीतरी गोष्टी सुक्ष्म स्वरुपाने घडत असतात.याचं एकच कारण की मला कोणी पाहिले नाही हा गैरसमज. किंवा आपल्या ठायी असलेलं अज्ञान.
आत्मशक्तीचा विकास करता आला की सारे मुखवटे गळुन पडतात,पहाणारा तर जवळच होता हे सत्य समजले की अज्ञान दुर होते.
माऊली म्हणतात,
आहे मी कोण हा करावा विचार।
म्हणे ज्ञानेश्वर निवृतीचा।।
तो मी म्हणजे ते जाणते तत्व आहे. ते आत्मज्ञानाने समजते.आत्मज्योत पेटली की मग असत्याचा अंधकार रहात नाही.तिच सत्य जीवन व्यतीत करणारी प्राणेश्वरी असुन ती गुरुसंक्रमीत आहे.
रामकृष्णहरी

from https://ift.tt/3g0U7QI

By News

Leave a Reply

Your email address will not be published.