पारनेर :आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जात असताना प्रत्येकानी स्वतःला सिद्ध करण्यासाठी जर वेळ दिला तर अशक्य असे काहीच नाही त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जवळ असणाऱ्या सुप्त गुणांना वाव दिला पाहीजे तरच खऱ्या अर्थाने आपण आपल्या भविष्याची घडी बसू शकते.व कोणत्याही क्षेत्राला कमी न लेखता आपले कष्ट प्रामाणिकपणे हेच खरे यशाचे गमक असते असे मत पारनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय सेवा विभागाच्यावतीने नियमित उपक्रमांतर्गत कोरोना नंतरचे शिक्षण व भविष्यातील संधी या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत प्राचार्य आहेर बोलत होते.

सध्याच्या काळात जग ग्लोबल होत चालले आहे अनेक क्षेत्रात बदल होत चालले अशा परिस्थिती मध्ये चिंता न करता स्वतः मध्ये बदल केला पाहीजे तरच भविष्यकाळ आपणासाठी मारक ठरू शकतो त्यामुळे शिक्षणाबरोबर अनेक क्षेत्रात असणाऱ्या संधी शोधल्या पाहीजे व आपले अस्तित्त्व प्रस्तापित केले पाहीजे असे सांगत प्राचार्य आहेर म्हणाले की, आपणामधील मी पण बाजुला केला पाहिजे व सर्व समावेशक राहीले पाहीजे तरच आपणाला एक वेगळी उंची प्राप्त होऊ शकते म्हणुन २१ व्या शतकामध्ये सर्वच क्षेतात होणाऱ्या बदलांना अनुसरून आपल्या क्षेत्रात संधी शोधण्याचा प्रयत्न केला पाहीजे व भिती न बाळगता वाटचाल केली पाहीजे म्हणून मुलांनी महाविदयालयीन शिक्षण घेत असताना वेगवेगळ्या क्षेत्रात संधी शोधत राहीले पाहीजे तरच आपण घेतलेल्या शिक्षणाचा फायदा स्वतः साठी होऊ शकतो व आपली वेगळी ओळख निर्माण होऊ शकते असे मत प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांनी मांडले.
प्रसंगी महाविदयालयाचे उपप्राचार्य डॉ. दिलीप ठुबे, राष्ट्रीय सेवा कार्यक्रम अधिकारी डॉ .अशोक घोरपडे , डॉ.सोनटक्के, डॉ. एच. वाय. गायकवाड, डॉ. संजय गायकवाड, डॉ सुधीर वाघ,डॉ. युवराज वाघेरे, डॉ. हरेश शेळके , डॉ. राऊत, डॉ. रघुनाथ नजन , प्रा.प्रतिक्षा तनपुरे तसेच महाविदयालयातील सर्व शाखांमधील प्राध्यापक व स्वयंसेवक उपस्थितीत होते सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.संजय आहेर यांनी तर आभार डॉ.दत्तात्रय घुंगार्डे यांनी मानले

from https://ift.tt/3GeIzEk

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *