
शिरूर : मोराची चिंचोली येथे सहलीसाठी गेलेल्या सुमारे 40 महिलांचा प्रसंगावधान राखून जीव वाचविणाऱ्या वाघोली येथील योगिता सातव या रणरागिनीचा शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी घरी जाऊन सत्कार केला.
वाघोली येथील महिलांचा ग्रुप मिनी बसने मोराची चिंचोली येथे पर्यटनासाठी गेला होता. अचानक बस चालकाला फिट आल्याने तो खाली पडला.यावेळी महिला घाबरलेल्या असताना प्रसंगावधान राखत बसमधील सौ.योगिता धर्मेंद्र सातव यांनी बसचे स्टेअरिंग आपल्या हातात घेऊन महिलांना सुखरूप इच्छित स्थळी पोहोचविले तर चालकास वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले.
चालक व महिलांचा जीव वाचवल्याबद्दल सौ.योगिता सातव यांची भेट घेऊन शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी त्यांचा सत्कार केला.” त्यांनी केलेल्या धाडसाचे कौतुक करावे तितके कमीच आहे. त्यांचे हे कार्य महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारे आहे,” असे आमदार श्री पवार यांनी यावेळी सांगितले.
from https://ift.tt/3KwPHz9