आई वडिलांची सेवा न करणाऱ्या मुलांची संगत टाळावी !

 

Table of Contents

संगतीनेच मनुष्य घडतो किंवा बिघडतो.चांगली संगत मिळण्यासाठी आपला संस्कार उच्च असावा लागतो.चांगल्या संगती भाग्यानेच मिळत असतात.जी मुलं आपल्या आईवडीलांना दुर करुन प्रपंच करतात ती मुलं विश्वासार्ह नसतात.फक्त स्थावर जंगम कमावण्याची धडपड चालू असते.त्यासाठी ते कुणालाही फसवायला तयार असतात.प्रेमाचा उमाळा त्यांच्यात नसतोच.दिसलाच तर तो बेगडी असतो.त्याची पत्नी मुलं यांच्यावर तो कुसंस्कार पक्का होतो.पत्नी सासुसासऱ्यांना तुच्छ समजते,त्यामुळे सेवा घडणे दुरच.नातवंडांमधेही आजीआजोबा विषयी प्रेम रहात नाही. हा दोष संपुर्ण पुढच्या पिढीत उतरतो.
तुकोबाराय म्हणतात,
स्वामीकाज गुरुभक्ती।
पितृवचन सेवापती।
हे चि विष्णुची महापुजा।
अनुभव नाही दुजा।।
स्वामीकाज,गुरुभक्ती,वडिलांचा शब्द पाळणं आणि पतीची सेवा करणं ही भगवतसेवा असल्याचं या चरणात तुकोबाराय म्हणतात.यातली एकही सेवा कमी दर्जाची नाही. पण सेवा करुन घेणारातही ती योग्यता असली पाहिजे. सासुसासऱ्यांना दूर लोटुन पतीची सेवा करणं म्हणजे राक्षसकुलीन होणं आहे.
सज्जनहो आपण अशा परिवाराच्या मैत्रीपासून दूर राहिले पाहिजे.अशा परिस्थितीत दोन परिवारातील स्रिया एकत्र येतील तर घरात आपोआप कलह निर्माण होईल. कारण नकारात्मक ऊर्जा वेगाने प्रवेश करते.आपली सात्विकता जर टोकाची असेल तर भिती नाही. पण दारु न पिणाराने घरात दारुची बाटली ठेवण्यासारखं हे आहे. तुम्ही दुध असाल तर मिठाच्या खड्याला दुर ठेवलं पाहिजे. म्हणजे कुसंगतीपासुन वाचलं पाहिजे.आपल्याला अशी कुसंगत आवडत असेल तर आपल्यात ते दुर्गुण शिरलेले आहेत किंवा त्यांचं संक्रमण सुरू आहे असं समजावं.
समाजात आपण कितीही उजळ माथ्याने फिरत असला तरी सत्य लपत नाही आणि त्यापासून निर्माण होणारा भोगही चुकत नाही. म्हणून आनंदी जगुनच मरु इच्छिणारांनी अशा कुसंगतीचा वाराही स्वतःला आणि परिवाराला लागु देऊ नये.
रामकृष्णहरी

from https://ift.tt/r4N3KIL

Leave a Comment

error: Content is protected !!